मध्य प्रदेशमध्ये भाजपची तातडीची बैठक !

0

भोपाळ-मध्य प्रदेशसह देशातील ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपवर कॉंग्रेस वरचढ ठरत असल्याचे दिसून येते. कॉंग्रेस आघाडीवर आहे. भाजप कॉंग्रेसमध्ये काटे की टक्कर सुरु असून एक-दोन जागांवर मागे-पुढे अशी स्थिती आहे. दरम्यान ही स्थिती पाहून भाजपने तातडीची बैठक बोलविली आहे. जर भाजपला बहुमत मिळाला नाही तर अन्य पक्षाच्या उमेदवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याबाबत भाजपची हालचाली सुरु आहे. त्यामुळेच तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे.