मध्य प्रदेशमध्ये मायावतीने दिले कॉंग्रेसला समर्थन !

0

भोपाळ-मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता उलथली आहे. कॉंग्रेस सर्वाधिक जागा मिळवून क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. कॉंग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा करत राज्यपाल यांच्याकडे वेळ मागितली आहे. दरम्यान कॉंग्रेसला २ जागांची आवश्यकता असून बहुजन समाज पार्टीने कॉंग्रेसला समर्थन दिले आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी कॉंग्रेसला समर्थन जाहीर केले आहे. कालच मायावती यांनी बसपा कोणत्याही परिस्थितीत भाजप सोबत जाणार नाही असे सांगितले होते. कॉंग्रेस आणि बसपाची विचारसरणी एकच असून त्यामुळे कॉंग्रेसला बसपा समर्थन देत आहे असे मायावती यांनी जाहीर केले आहे.