मध्य प्रदेशातील कलाकारांचा आविष्कार

0

मुंबई  । दसरा आणि दिवाळी सणानिमित्त मध्य प्रदेशातील अनेक नामवंत व गुणवान कलाकारांनी एकत्रितपणे सादर केलेला त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींचा अनोखा आविष्कार हातमाग आणि हस्तकलेचे प्रदर्शन दादर येथील प्रसिद्ध शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यासमोरच्या महाराष्ट्र स्टेट स्काउट्स आणि गाइड्सच्या हॉलमध्ये 26 ते 30 सप्टेंबर, 2017 यादरम्यान सकाळी 9.30 ते रात्री 9.30 हया वेळेत पाहायला मिळणार आहे. मध्य प्रदेश सरकारच्या अखत्यारीत असलेल्या संत रविदास एम. पी. हस्तकला विकास निगम लि.च्या ‘मृगनयनी’ या विभागातर्फे हे प्रदर्शन आयोजित केले आहे. सदर प्रदर्शनात मध्य प्रदेशातील विविध भागातील अनेक कलाकारांचा समावेश असून त्यांनी साकारलेल्या कलाकृतींद्वारे रसिकांना अनेक सांस्कृतिक विशेषांचे व अभिव्यक्तित्वांचे एक आगळेवेगळे दर्शन घडणार आहे.

मध्य प्रदेशातील नामवंत व होतकरू कलाकारांनी साकारलेल्या वेगवेगळ्या हस्तकला, शिल्पे आणि चित्रे तसेच हातमागावरील कलाकृती यांचा या प्रदर्शनात समावेश आहे. त्यात चंदेरी, माहेश्‍वरी, मलबेरी, तुसार, सिल्क साड्या व ड्रेस मटेरियल्स, रेडिमेड गारमेंट, बेड कव्हर, बेल मेटल, गोंद पेंटिंग, गोल्ड ठेवा ज्वेलरी अशा अनेक आकर्षक कलाकृतींचा समावेश आहे. मध्य प्रदेशात प्रसिद्ध असलेल्या सर्व कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या असून, रसिकांना त्याचा पुरेपूर लाभ घेता येणार आहे.