मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारकडून नसबंदीचा अजब फतवा !

0

भोपाल: इंदिरा गांधींचे सरकार असताना पुरुषांना पकडून जबरदस्तीने नसबंदी करण्यात येत होती. लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकारने ही पाऊल उचलले होते. मात्र आता मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने पुरुष बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवा आद्यादेश जारी केला आहे. २०१९-२० या वर्षात जर कमीत कमी एकाची नसबंधी करावी, वर्षभारत एकही नसबंदी करण्यात अपयश आल्यास त्यांना सक्तीने सेवेतून कमी करण्याचा आदेश कमलनाथ सरकारने जारी केला आहे.

नसबंधीसंबंधी दिलेलं टार्गेट पुर्ण न केल्यास त्या कर्मचाऱ्याला सक्तीची निवृत्ती दिली जाईल. या आद्यादेशामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारवर टीका होत आहे. राष्ट्रीय कुटुंब नियोजन सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार मध्य प्रदेशातील ०.५ टक्के पुरुषांनी नसबंदी केली आहे.