नवी दिल्ली – पाच राज्यांमधील मतदान प्रक्रिया संपली आहे. विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलद्वारे अंदाज वर्तविला आहे. दरम्यान संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मध्य प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये यांच्यात मुख्य लढत झाली आहे. टाइम्स नाऊ-सीएनएक्सने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपा चौथ्यांदा सत्ता राखेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र इंडिया टुडे – अॅक्सिस माय इंडिया आणि रिपब्लिक- सीवोटर राज्यात काँग्रेस आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
टाइम्स नाऊ-सीएनएक्सने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपाला १२६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 89, बसपाला 7 आणि इतरांना 9 जागा मिळण्याची शक्यता आहे.
तर इंडिया टुडे – अॅक्सिस माय इंडियाने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यातून भाजपाची सत्ता जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया टुडे – अॅक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला १०४ ते १२२ तर भाजपाला १०२ ते १२० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रिपब्लिक- सीवोटरनेही मध्य प्रदेशमध्ये भाजपाची सत्तेतून एक्झिट होईल, असा अंदाज वर्तलवला आहे. या पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला ११० ते १२६ तर भाजपाला ९० ते १०६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर इथे इतरांना 6 ते 22 जागा मिळण्याची शक्यता आहे.