मध्य प्रदेश ईव्हीएम वाद: आज कमलनाथ घेणार मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

0

भोपाळ-मध्य प्रदेशमध्ये विधानसभेसाठी २८ रोजी मतदान झाले. मात्र मतदान झाल्यानंतर देखील काही ठिकाणी ४८ तास उशिरा मतदानयंत्र स्ट्रॉग रूमवर पोहोचले. काही ठिकाणी सीसीटीव्ही बंद असल्याचे दिसून आले. यावरून कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपवर संशय घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. दरम्यान आज कॉंग्रेस नेते कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेणार आहे. आज दुपारी भेट घेणार आहे.

संबंधित घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे.