मध्य प्रदेश, छत्तीसगडनंतर भाजपच्या ‘या’ राज्य सरकारकडून कर्ज सवलत !

0

दिसपूर-मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात कॉंग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. कॉंग्रेसच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत आहे. दरम्यान आसाममधील भाजप सरकारने देखील शेतकऱ्यांना कर्ज सवलत देण्याची घोषणा केली आहे.

कर्जाच्या व्याजात ४ टक्के सूट देण्याचा निर्णय आसाम सरकारने घेतला आहे. तसेच केंद्राकडून घेतलेल्या कर्जावर ३ टक्के असे एकंदरीत ७ टक्के व्याजात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

खुद्द मुख्यमंत्री यांनी याबाबत ट्वीटरवर माहिती दिली आहे.