मध्य प्रदेश निवडणूक: नंदुरबार जिल्ह्यात कामाला असणाऱ्या मतदारांना पगारी सुट्टी

0

नंदुरबार। मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात कामासाठी आलेल्या कामगारांना करणाऱ्या मध्य प्रदेशमधील मतदारांना २८ नोव्हेंबर रोजी पगारी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. उद्या मध्य प्रदेशात मतदान होत आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, बडवानी (मध्यप्रदेश) यांनी मध्यप्रदेशातील रहिवासी व मतदार यांना मतदानाचा हक्क बजविण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात काम करणाऱ्या व्यक्तींना एक दिवसाची पगारी सुट्टी देण्याबाबत कळविले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मध्यप्रदेश राज्यातील मतदार असणारे व नंदुरबार जिल्ह्यात काम करणाऱ्या व्यक्तींना पगारी सुट्टी जाहिर केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कारखाने, औद्योगिक संस्था व इतर संस्था यांनी आदेशाची अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केल्या आहेत,