भोपाळ- मध्यप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहे. त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. काल रात्री उशिरापर्यंत भाजपच्या प्रदेश निवडणूक समितीची बैठक झाली. त्यात १७० जागेवर उमेदवारांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. वर्तमान मंत्री, आमदार, माजी आमदार आणि त्यांच्या मुलांची नावे समोर येत आहे.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलेल्या सर्वेच्या आधारे उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीत २३० जागेवर चर्चा झाली त्यापैकी १७० जागांवर आतापर्यंत सहमती झाली आहे.