मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

0

मुंबई । रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. परळ आणि करी रोड येथील लष्कराकडून उभारण्यात येणार्‍या पादचारी पुलांसाठी गर्डर टाकण्याचे काम 4 फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे. या कामांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते दादपर्यंत अप जलद मार्गावर सकाळी 8.30 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत, तर डाऊन जलद आणि अप व डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 पर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

शेवटची जलद लोकल 8.12 वाजता
सीएसएमटी ते दादर फेर्‍या होणार नाहीत, सकाळी दादर स्थानकात सीएसएमटीला जाणारी शेवटची जलद लोकल 8.12 वाजता येईल. दादर स्थानकात सीएसएमटीला जाणारी शेवटची धिमी लोकल सकाळी 9.00 वा. येईल. सीएसएमटीहून शेवटची धिमी लोकल सकाळी 9.05 वा. तर सीएसएमटीहून शेवटची जलद लोकल सकाळी 9.12 वा. सुटेल.