भुसावळ : मध्य रेल्वेचे जीएम संजीव मित्तल हे शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी भुसावळ दौर्यावर येत आहेत. या पार्श्वभुमीवर भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी भुसावळ जंक्शन स्थानकाची मंगळवारी सायंकाळी पाहणी केली. यावेळी स्थानकावरील विविध विकासकामांची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामांबाबत सूचना केल्यात. मध्य रेल्वेचे जीएम संजीव मित्तल हे शुक्रवारी भुसावळ विभागाच्या दौर्यावर येत असून खंडवा ते भुसावळ मार्गाची ते पाहणी करतील तर खंडवा, बर्हाणपूर, रावेर व भुसावळ रेल्वे स्थानकाची पाहणार आहेत. प्रवाशांना दिल्या जाणार्या सुविधा योग्य प्रकारे दिल्या जात आहे का नाही, याची पाहणी ते करतील. जीएम मित्तल हे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म चारवर निरीक्षण करणार आहे तसेच तिकीट निरीक्षक यांच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. संपूर्ण स्थानकाची पाहणी ते करतील.