मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.मिश्रा आज भुसावळ विभागाच्या दौर्‍यावर

0

भुसावळ- मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.मिश्रा शुक्रवारी भुसावळ विभागाच्या दौर्‍यावर येत असून ते विविध विभागांचा आढावा घेण्यासोबतच अनेक कामांचे त्यांच्या हस्ते उद्घाटनही होणार आहे. भुसावळ रेल्वे स्थानकाचा बदलत असलेल्या चेहर्‍या-मोहर्‍याचीदेखील जीएम पाहणी करणार असून प्रवाशी सुविधांबाबत आढावा घेणार आहेत. दौर्‍याचे पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासन अलर्ट झाले असून गुरूवारी रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले.

विविध कामांचे जीएम करणार उद्घाटन
शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बडनेरा रेल्वे स्थानकावर जीएम स्पेशल ट्रेनचे आगमन होणार असून रेल्वे स्थानकाचे पाहणीनंतर इंजिनिअरींग कार्यालयाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर अ‍ॅक्सीडेंट रीलिफ ट्रेनचे निरीक्षण केले जाणार असून आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवण्याबाबत सूचना करण्यात येणार आहेत. त्यानंतर बोरगाव स्थानकाचे निरीक्षण, अकोला रेल्वे स्थानकाचे निरीक्षण, नवीन आरआरची पाहणी, प्रवाशांसाठी असलेल्या हिंदी लायब्ररीचे उद्घाटन, त्यानंतर शेगाव स्थानकाचे निरीक्षण केल्यानंतर भक्तांसाठी सुविधा पुरवण्याबाबत आढावा व त्यानंतर सायंकाळी पावणेपाच वाजता भुसावळ स्थानकावर आगमन झाल्यानंतर स्थानक व स्थानकाबाहेर सुरू असलेल्या कामांची पाहणी तसेच लोहमार्ग पोलिसांच्या नवीन ईमारतीचे उद्घाटन शर्मा यांच्या हस्ते होणार आहे. पाहणी दौर्‍या डीआरएम आर.के.यादव यांच्यासह रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.