मध्य रेल्वेच्या जीएम दौर्‍याने भुसावळ विभागात धावपळ

0

भुसावळ – प्रतिनिधी – मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा हे ६ जानेवारी रोजी भुसावळ विभागाच्या वार्षिक निरीक्षणासाठी भुसावळ येथे येत असून त्या पार्श्‍वभूमीवर प्रलंबित कामांना वेग देण्यात आला आहे. मनमाड ते भुसावळ मार्गावरील विविध स्थानकांना शर्मा हे भेट देऊन पाहणी करणार असल्याने या स्थानकांवर रंगरंगोटीसह अन्य अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. १ जानेवारीपर्यंत कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे तर त्यासाठी नियुक्त अधिकारी कामांचा आढावादेखील घेत आहेत. जीएम शर्मा हे पुणे विभागात १३, विभागात २१ तर नागपूर विभागात २७ रोजी भेट देऊन पाहणी करतील, असे सूत्रांनी सांगितले.