मध्य रेल्वेच्या पीओएचसह आरपीएफ व कार्मिक विभागाला जीएम शील्ड

0

भुसावळ- मध्य रेल्वेच्या जीएम अ‍ॅवार्डची मंगळवारी मुंबईत घोषणा झाली. भुसावळ विभागातील पीओएच, रेल्वे सुरक्षा बल आणि कार्मिक विभागाला स्वतंत्र जीएम शील्ड जाहीर झाले असून इंजिनिअरिंग विभागात भुसावळ आणि मुंबईला संयुक्त शिल्ड मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. मध्य रेल्वेतर्फे विभागातील पाचही विभागांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल शिल्ड देऊन गौरवले जाते. मंगळवारी मध्य रेल्वे जीएम शिल्डची घोषणा झाली. भुसावळ विभागातील नाशिक रोड रेल्वे स्थानक स्वच्छ स्थानक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या स्थानकाला स्वतंत्र शिल्ड जाहीर झाले आहे. लवकरच मुंबईमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात शील्डचे वितरण केले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.