भुसावळ । दहावी बारवीच्या परिक्षा सुरू आहे.यानंतर पालक व मुले सुट्याचे नियोजन करणार बाहेर फिरायला निघणार यामुळे रेल्वे वाहतुकीवर ताण पडू नये व प्रवाशांना आरक्षण मिळावे त्यांना जास्तीत जास्त गाड्या प्रवाशासाठी उपलब्ध व्हाव्या.यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सेवेसाठी मुंबई, नागपूर, पुणे, गोरखपूर, पटनासाठी विशेष उन्हाळी रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे – नागपूर साप्ताहिक स्पेशल गाडी – क्र. 01029 ही गाडी रविवार 8 एप्रिल ते 17 जून दरम्यान पुणे येथून काळी 5.15 वाजता रवाना होऊन रात्री 11 वाजता नागपूर पोहचेल. परती दरम्यान गाडी क्र. 01030 ही गाडी 7 एप्रिल ते 16 जून दरम्यान नागपूरहून दर शुक्रवारी सकाळी 9.20 वाजता रवाना होऊन ती दुसर्या दिवशी पहाटे 2.45 वाजता पूणे पोहचेल. ही गाडी बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड स्थानकांवर थांबेल. मुंबई- जम्मूतावी एसी सुपरफास्ट एक्सप्रेस – गाडी क्र 02171 ही गाडी सी.एस.टी. मुंबईहून सकाळी 6.45 वाजतस दर शुक्रवार 7 एप्रिल ते 30 जून दरम्यान रवाना होवून दुसर्या दिवशी जम्मूतावी पोहचेल.
परती दरम्यान गाडी क्र. 02172 जम्मू तावीहून सकाळी 7.20 वाजता रवाना होवून दर रविवार 9 एप्रिल ते 7 जुलै दरम्यान सायंकाळी 6 वाजता पोहचेल. ही गाडी दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, स्थानकांवर थांबेल. मुंबई- लखनऊ एसी सुपरफास्ट साप्तहिक विशेष एक्सप्रेस- गाडी क्र 02111 ही गाडी 4 एप्रिल ते 27 जून दरम्यान दर मंगळवारी दुपारी 2.20 वाजता सुटेल व दुसर्या दिवशी दुपारी 1:10 वाजता लखनऊ पोहचेल. परतीला दरम्यान गाडी क्र 02112 लखनऊहून 5 एप्रिल ते 28 जून दरम्यान दर बुधवारी दुपारी 5 वाजता सुटेल. दुसर्या दिवशी सायंकाळी 4.25 वाजता सीएसटी मुंबई पोहचेल ही गाडी कल्याण, ईगतपुरी, भुसावळ, इटारसी, भोपाळ, झाशी, ओराई, कानपूर स्थानकांवर पोहचेल. या गाडीला 13 एसी थ्री टीयर कोच असतील. मुंबई -पटना साप्ताहिक – गाडी क्र 01177 ही विशेष गाडी सीएसटी मुंबईहून दर सोमवारी 3 एप्रिल ते 26 जून दरम्यान मध्यरात्री 12:20 वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी सकाळी 8 वाजता पटना पोहचेल.
या गाडीला 20 जनरल डबे असतील. ही गाडी नाशिक, जळगाव, भुसावळ, खंडवा स्थानकांवर थांबेल. पटना -सीएसटी मुंबई साप्ताहिक विशेष एक्सप्रेस – गाडी क्र 02054 विशेष गाडी पटनाहून दर मंगळवारी 4 एप्रिल ते 27 जून दरम्यान सकाळी 10 वाजता निघुन दुसर्या दिवशी सायंकाळी 4:30 वाजता सीएसटी मुंबई पोहचेल. ही गाडी खंडवा, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड स्थानकांवर थांबेल. या गाडीला 20 जनरल डबे राहतील. एलटीटी- गोरखपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस – गाडी क्र 01117 विशेष गाडी लोकमान्य टिळक़ टर्मिनस येथून दर मंगळवारी 4 एप्रिल ते 27 जून दरम्यान सकाळी 7:50 वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी दुपारी 4 वाजता गोरखपूर पोहचेल. परतीला दरम्यान गाडी क्र 01118 ही गाडी गोरखपूर येथून पहाटे 5 वाजता सुटेल. 6 एप्रिल ते 29 जून दरम्यान दर गुरुवारी दुपारी 4.55 वाजता एलटीटी पोहचेल.
4 एप्रिल ते 27 जून सुरु राहणार
गाडी भुसावळ, नाशिक रोड,खंडवा स्थानकांवर थांबेल. या गाडीला 20 जनरल डबे असतील. लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर – गाडी 01115 ही गाडी एलटीटी स्थानकावरुन 1 एप्रिल ते 24 जून दरम्यान दर शनिवारी मध्यरात्री 12:45 वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी सकाळी 10:50 वाजता गोरखपूर पोहचेल. गाडी क्र 01116 गोरखपूरहून 2 एप्रिल ते 25 जून दरम्यान दर रविवारी दुपारी 2 वाजता सुटेल व तिसर्या दिवशी मध्यरात्री 12:20 वाजता पोहचेल.