मध्य रेल्वेवर आज साडेतीन तासांचा ब्लॉक

0

मुंबई। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाकुर्ली येथे रोड ओव्हर ब्रीजसाठी चार गर्डर टाकण्याचे काम सुरु आहे, त्यामुळे रविवारी मध्य रेल्वेवर सकाळी 9.25 ते दुपारी 12.45 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे मध्य रेल्वेवरील लोकल व लांब पल्ल्यांच्या गाडयांच्या फेर्‍या रद्द करण्यात येणार आहेत. मात्र हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार नाही. कल्याण ते डोंबिवली येथून सुटणार्‍या उपनगरीय गाडया रद्द करण्यात येतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 8.36 ते 11.34 पर्यंत कसारा, आसणगाव, टिटवाळा येथे सुटणार्‍या धीम्या मार्गावरील गाडया आणि कसारा, आसणगाव, टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला रवाना होणार्‍या गाडया रद्द करण्यात येतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 8.29 ते 11.50 पर्यंत अंबरनाथ, बदलापूर, कर्जतला जाणार्‍या गाडया आणि अंबरनाथ, बदलापूर, कर्जत येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला रवाना होणार्‍या सर्व गाडया रद्द करण्यात येतील.

केडीएमटीची जादा बस सेवा
रेल्वेच्या मेघा ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने या वेळेत कल्याण डोंबिवली या मार्गावर प्रवाश्यांच्या गर्दीनुसार परीवहन उपक्रमाच्या जादा बसेची सोय उपलब्ध करून दिली असून आवश्यकतेनुसार बसेसच्या फेर्‍या उपलब्ध करून देण्याचे नियोजन परिवहन उपक्रमाकडून करण्यात आल्याची माहिती पालिकेने प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.

पश्‍चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक
पश्‍चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भाईंदरदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11 ते 4 यावेळेत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक दरम्यान विरार, वसई ते बोरीवली आणि बोरीवली ते वसई विरार दरम्यान धावणार्‍या सर्व गाडया अप आणि डाउन धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.