मध्य रेल्वे सरव्यवस्थापकांकडून विद्युत इंजिन कारखान्याची तपासणी

0

सायंकाळी रेल्वेच्या उद्यानासह जुन्या वस्तू संग्रहालयाचे लोकार्पण होणार

भुसावळ- मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा यांचे गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजता भुसावळात आगमन झाले. जी.एम.स्पेशल गाडीचे प्लॅटफार्म क्रमांक आठवर आगमन झाल्यानंतर डीआरएम आर.के.यादव यांनी शर्मा यांचे स्वागत केले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर रेल्वे अधिकार्‍यांची उपस्थिती होती. शर्मा यांनी सकाळी विद्युत इंजीन कारखाना (पीओएच) भेट देवून तपासणी केली त्यानंतर दुपारून झोनल ट्रेनिंग सेंटरची शर्मा हे वार्षिक तपासणी करणार आहेत. याप्रसंगी मुख्य इलेक्ट्रीक विभागाच्या अभियंत्यांसह विविध विभागाच्या अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

सायंकाळी उद्यानाचे लोकार्पण
बसस्थानक मार्गावर रेल्वेकडून जुन्या वस्तूंचे संग्रहालय उभारण्यात आले असून त्यात कोळश्याचे इंजीन, जुना प्रवासी डबा, जुने डीझेल इंजीन ठेवण्यात आले आहे. तसेच रेल्वेच्या अन्य जुन्या वस्तूही तेथे ठेवण्यात आल्या आहेत. या संग्रहालयाचे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता जी.एम.शर्मा हे उद्घाटन करतील तत्पूर्वी रेल्वे स्थानकाबाहेरील उद्यानाचेही लोर्कापण करण्यात येणार आहे. दरम्यान, सायंकाळी जी.एम.प्रसिद्धी माध्यमांसह विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत.