‘मनकर्णिका द क्वीन ऑफ द झाशी’साठी कंगणाला प्रशिक्षण

0

नवी मुंबई | नवी मुंबईतील छावा प्रतिष्ठानतर्फे प्रशिक्षित मुली सध्या हैद्राबादेत रामोजी फिल्म सिटीमध्ये ‘मनकर्णिका द क्वीन ऑफ द झाशी’ चित्रपटासाठी अभिनेत्री कंगना राणावत व इतर कलाकारांना प्रशिक्षण देत आहेत. मुंबईतील मेहबूब स्टुडीओत ऑडीशन्समध्ये हर्षदा सुतार, ज्योती कोंढाळकर, मृदुला गायकवाड, अमृता दळवी यांनी बाजी मारली होती.

छावा प्रतिष्ठान गेल्या पंधरा वर्षांपासून लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा विविध प्रकारच्या शिवाजी महाराजांच्या काळातील गनिमी युद्ध कौशल्याचे प्रशिक्षण देत आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक व प्रशिक्षक अमित गडांकुश हेही या मुलांसमवेत हैदराबादेत कंगणाला बारकावे शिकवित आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते कमल जैन, स्टंट दिग्दर्शक निक पॉवेल हे नवी मुंबईकरांच्या कामगिरीवर खूष आहेत.