मनपाचा करमुक्त अर्थसंकल्प महासभेत सादर

0

कल्याण । कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे 2017-18 या आर्थिक वर्षासाठी स्थायी समितीने तयार केलेले 1 हजार 994 कोटी 13 लाख 57 हजार रुपये जमेचा व 1 हजार 994 कोटी एक लाख सहा हजार खर्चाचा तर 12 लाख 51 हजार शिलकीचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन व महापौर राजेंद्र देवळेकर यांना शनिवारी महासभेत सादर केला. बुधवारी यावर चर्चा झाल्यावर त्याला अंतिम मंजुरी मिळेल.यंदाच्या अंदाजपत्रकात सर्वाधिक प्राधान्य सार्वजनिक स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाला देण्यात आले असून कचराकुंडीमुक्त आणि कचरामुक्त स्वच्छ सुंदर कल्याण-डोंबिवली शहर देण्याचा मानस असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले. तर अनेक सोयी सुविधांचा विचार करताना शहरातील करदात्यांवर कराचा कोणताही बोजा वाढणार नाही हेही लक्षात घेण्यात आले. उत्पन्नाच्या बाबी विचार करताना म्हात्रे यांनी सांगितले की, मालमत्ता क्षेत्रातील अनेक मालमत्तांना सुधारीत कर आकारणी करण्यात आलेली नाही. मालमत्ता करापोटी 503 कोटी 26 लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. स्थानिक संस्था करामध्ये 277 कोटी 77 लाखाचे उत्पन्न अपेक्षित केले आहे. पाणीपटटी वसुलीत 83 कोटी35 लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. रस्त्यांवरील पार्कीगसाठी निश्‍चित धोरण आखून त्यांच्यासाठी शुल्क आकारणी करणे गरजेचे आहे. महापालिका स्त्रोताव्दारे शासन अनुदानासह एकूण रक्कम रुपये एक हजार 266 कोटी 78 लाखाचे महसुली उत्पन्न प्राप्त होणार आहे. एमएमआरडीए सहभागातून चालू असलेल्या विकासकामांसाठी मिळणारा निधी इत्यादीचा समावेश असून याव्दारे रक्कम 683 कोटी 56 लाखांचा निधी प्राप्त होण्याचे अपेक्षित असल्याचेही म्हात्रे यांनी त्यांच्या मनोगतात म्हणले आहे.

प्रमुख तरतुदी
नवीन प्रशासकीय इमारत उभारणीसाठी 2कोटी 24 लाख, महापालिका हददीतील झोपडपटटी घोषित करणे, डोंबिवली स्पोर्टस क्लबचा पुनर्विकास मांडा ,वडवली आणि ठाकुर्ली येथे उडडाणपुल बांधणे यासाठी 29 कोटी, अग्निशमन बळकटीकरणासाठी चार कोटी 30 लाख, क्षेपणभुमी सुधारणासाठी 69 कोटी 73 लाख, ई गव्हर्नन्ससाठी 7 कोटी रुपये, नगरसेवकांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सिटी पार्कसाठह 10 कोटी रुपये, डोंबिवलीत एलीव्हेटेड रिक्षा स्टॅन्ड उभारणे यासाठी एक कोटी शालेय विद्याथ्यार्ंना टॅब वाटप करण्यासाठी 10 लाख रुपये कल्याण, डोंबिवली,टिटवाळा येथे 750 मीटर अंतररावर प्रसाधनगृहे उभारणे, महापालिका चार प्रभाग क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर 24 बाय 7 पाणीपुरवठा करणे, सहा शाळांमध्ये र्व्हच्युअल क्लासरुमसाठी 25 लाख रुपये, मासळी मार्केटचे नुतनीकरण करणे, 1 घनकचरा व्यवस्थानात ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येत नाही. तसेच डम्पिंग ग्राऊंडवर शास्त्रोक्त पदधतीने विल्हेवाट लावली जात नाही. शहर स्वच्छता अभियान प्रभाविपणे राबविण्यासाठी प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर निर्बध आणण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात येणार आहेत. कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी उंबर्डे येथे कचर्‍यापासून उर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच फुलांच्या कचर्‍याचे 24 तासात खतात रुपांतर करण्यासाठी एक यंत्र प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आले असून यासाठी 24 लाखांची तरतुद केली आहे. 2 सेफ सिटी अंतर्गत नागरीकांच्या सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले असुन सुमारे 52 कोटी रुपये खर्चाचे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. 3 इंटरनेट ही काळाची गरज असल्याने कल्याण-डोंबिवली वायफाय सिटी करण्यासाठी ओप्टीकल फायबर नेटवर्क उभारणार आहे. 4 इकोफ्रेंडली सिटी अंतर्गत रेनवॉटर हार्वेस्टींगला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच यावर्षी पालिका क्षेत्रातील झाडांची गणना करण्यात येणार आहे. तसेच पालिका क्षेत्रात तब्बल 50 हजार नवीन झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. तर हरीत पटटा विकसित करण्यात येणार आहे.
5 खाडी किनारा सुशोभित केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन किमी किना-याचे सुशोभिकरण करणार आहे. सात तलावांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
6 महापालिका क्षेत्रात अनेक धोकादायक इमारती आहेत. मात्र एखादी इमारत रिकामी करावयाची असल्यास विस्थापीतांची राहण्याची व्यवस्था अर्थात संक्रमण शिबिर नाही. यंदा 100 ठिकाणी कुटुंबाची राहण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.