मनपाचा 1141 कोटींचे अंदाजपत्रक !

0

प्रभारी आयुक्तांनी केला सादर ; डेली मार्केट शुल्कवाढ प्रस्तावित ; सभा तहकुब

जळगाव– मनपाचा 2019- 20 या वर्षातील सुधारित आणि 2020-21 चे मुळ अंदाजपत्रक सादर करताना उत्पन्नाचा विचार करुन कोणतीही वाढ न करता प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी 1141 कोटी 96 लाखांचा अंदाजपत्रक सादर केला. दरम्यान, स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. प्रशासनाच्यावतीने सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकावर अभ्यास करुन निर्णय घेण्यासाठी सभा तहकुब करण्यात आली. मनपाचा अंदाजपत्रक सादर करण्यासाठी सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायी समितीची सभा झाली. यावेळी व्यासपीठावर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे,उपायुक्त अजित मुठे,मिनिनाथ दंडवते,मुख्यलेखा परिक्षक संतोष वाहुले,मुख्यलेखाधिकारी कपिल पवार,नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.

नागरी सुविधा देण्याचे प्रशासनासमोर आव्हान
मनपा प्रशासनाच्यावतीने अंदाजपत्रक सादर करतांना प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सादर केला. शहरवासियांना किमान नारगी सुविधा उपलब्ध करुन देणे मोठे आव्हान असून महसुली उत्पन्नाच्या वसुलीवर भर देवून ते पूर्ण करावे लागणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

168 कोटी शिलकीचा अंदाजपत्रक
मनपाचा 2019- 20 या वर्षातील सुधारित आणि 2020-21 चे मुळ अंदाजपत्रक 1141 कोटी 96 लाखांचा असून 168 कोटी 75 लाखांचा शिलकीचा अंदाजपत्रक प्रस्तावित करण्यात आला आहे. 2020-21 च्या अर्थसंकल्पात 128 कोटी 82 लाख आरंभीच्या शिलकीसह मनपाचे 582 कोटी 26 लाखांचे उत्पन्न,अनुदान 91 कोटी 82 लाख,असे एकूण 674 कोटी 8 लाख प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे 90 कोटी 61 लाखांचा मनपा निधी व 377 कोटी 27 लाख शासकीय निधी मिळून 1141 कोटी 96 लाखांचा अंदाजपत्रक प्रस्तावित करण्यात आला आहे.

हॉकर्सधारकांना दिलासा नाहीच
प्रशासनातर्फे सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात डेली मार्केट वसुलीत वाढ प्रस्तावित केली आहे. डेली मार्केट वसुलीची शुल्क आता 20 रुपये आहे. त्यात 30 रुपये वाढ करुन 50 रुपये वसुली प्रस्तावित करण्यात आली आहे. एकीकडे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जात नाही आणि दुसरीकडे तब्बल 30 रुपये वाढ प्रस्तावित केली आहे. त्यामुळे हॉकर्सधारकांना दिलासा मिळालेला नाही.

सन 2020-21 चा असा आहे मुळअंदाजपत्रक
उत्पन्न खर्च

मनपा उत्पन्न- 453 कोटी 44 लाख महसुली -354 कोटी 47 लाख
अनुदाणे -91 कोटी 82 लाख भांडवली -150 कोटी 86 लाख
मनपा निधी – 90 कोटी 61 लाख मनपा निधी – 90 कोटी 61 लाख
शासकीय निधी-377 कोटी 27 लाख शासकीय निधी-377 कोटी 27 लाख
आरंभीचा शिल्लक- 128 कोटी 82 लाख अखेरचा शिल्लक – 168 कोटी 75 लाख
एकूण – 1141 कोटी 96 लाख एकूण – 1141 कोटी 75 लाख