जळगाव। शहरातील नागरिकांची तक्रारींचे निराकरणाची जबाबदारी महापालिकेची असते. यासाठी लागणार्या कामांसाठी महापालिकेकडे निधीची आवश्यकता असते. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यास अडचणी येत आहेत. मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासन, नगरसेवक, पदाधिकार्यांची साथ लागणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी केली. ते महापालिकेच्या कॉल सेंटर व ‘स्मार्ट जळगाव’ अॅपच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, स्थायी सभापती वर्षा खडके, महिला व बाल कल्याण समिती सभापती कांचन सोनवणे उपस्थित होते.
कमीत कमी तक्रारी येतील असे काम करा
जिल्हाधिकारी किशोर राजेनिबांळकर पुढे म्हणाले की, तक्रारींचा निपटारा करणार्या पहिल्या तीन अधिकार्यांना बक्षीस, तर शेवटच्या तिघांवर कारवाई केली जाणार केली जाणार आहे. यातून कर्मचार्यांनी कमीत कमी तक्रारी येतील अशी कामे केली पाहिजेत अशी अपेक्षा जिल्हाधिकार्यांनी व्यक्त केली. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तीला आर्थिक विवेंचनेतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. महापालिकेची स्व मालकीची 17 मजली इमारत आहे. यातून महापालिकेची आर्थिक परिस्थिती पूर्वी चांगली असल्याचे यातून दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेला पूर्वीचे आर्थिक पाठबळ मिळवून देऊन पुन्हा उभे करू असे जिल्हाधिकार्यांनी यावेळी आश्वासित केले. प्रकल्प प्रुमख योगेश बोरोले यांनी अॅप व वेबपेजचे प्रोजेक्टरद्वारा सादरीकरण केले. यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजेिंनंबाळकर यांनी कॉल सेंटरला फोन लावून या सुविधेचे उद्घाटन केले. महापौर नितीन लढ्ढा यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, प्रशासनातील अधिकार्यांनी विचार केल्यास शहर स्मार्ट होवू शकते. जिल्हाधिकारी व आयुक्त या दोघ सकारात्मकत आहेत. प्रशसनात सकारात्मकता नसल्यास नागरिकांना दप्तर दिरंगाईस सामोर जावे लागते. आयुक्तांनी 1 वर्षांच्या कालावधीत सकारात्मक वृत्तींने काम केल्याने शहर स्मार्ट होईल यात शंका नसल्याचे लढ्ढा यांनी सांगितले. तसेच आयुक्त सोनवणे हे जून महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सेवाकार्यकाळ शासनाने दोन वर्षांचा वाढवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. अॅपच्या सुविधा दिल्याने नागरिकांचे श्रम व वेळ वाचेल. यातून अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित होऊन मनपाने चांगला उपक्रम सुरू केला असल्याचे सांगून श्री. लढ्ढा यांनी प्रशासनाची प्रशंसा केली. उपमहापौर कोल्हे यांच्या प्रयत्नांतून आयसीआयसीआय बॅकेने या सुविधेचे प्रायोजकत्व स्वीकारले असल्याचे श्री. लढ्ढा यांनी स्पष्ट केले.