जळगाव। महापालिकेची स्थायी समितीची सभा स्थायी सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली 26 मे रोजी शुक्रवार आयोजित केली आहे. सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसर्या मजल्यावर ही सभा होणार आहे.
विषय पत्रिकेनुसार बालवाडी मधील शिक्षिका व मदतनिसी यांना नविन नियुक्तीबद्दलचा प्रस्तावावर निर्णय, साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे 2017-18 या वर्षाच्या खर्चाला मंजूरीचा प्रस्तावावर चर्चा होणार आहे. तसेच महानगरपालिकेस आलेल्या निविदांवर निर्णय घेतला जाणार आहे. यासह इतर विषयांवर निर्णय घेण्यात येणार आहे. याप्रसंगी नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित राहतील.