मनपाचे 21 कर्मचारी होणार सेवानिवृत्त

0

जळगाव । महापालिकेतील 21 कर्मचारी 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यामध्ये शहर अभियंता दिलीप थोरात यांचा समावेश आहे.

चुनिलाल दौलत पाटील, एकनाथ हरीशचंद्र नेमाडे, सिताराम तुकाराम बारी, प्रकाश मंगो भारंबे, सुलाचना गणेश सोनवणे, धनराज सिताराम सोनवणे, सदाशिव बुधो नाथ या पाणी पुरवठ्यातील कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. दवाखाने विभागाचे शे. सुलातान शे. इस्माईल, अनिल काशिनाथ जगताप, किशोर रघुनाथ पांडे, जकात विभागाचे पंडित कोंडाजी पवार सेवानिवृत्त होत आहेत. सा.बांचे सुरेश भिला चौधरी, युसुफ शेख चाँद, विजय बाविस्कर तर सामान्य प्रशासनचे बाबुलाल देवराम सपकाळे, मधुकर शंकर ठाकूर, चंद्रकांत सदाशिव गोपर्डीकर तर आरोग्य विभागाचे कालु शेख चाँद, विष्णु मुर्‍हा पाटील हे कर्मचारी निवृत्त होत आहेत.