मनपाच्या आयुक्तपदी डॉ.माधवी खोडे-चवरे !

0

17 ला होणार रुजू; मनपाच्या 38 व्या आणि पहिल्या महिला आयुक्त

जळगाव: जळगाव मनपाच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ.माधवी खोडे- चवरे यांची नियुक्ती झाली आहे. त्या आयएएस 2007 बॅचच्या असून देशात 29 व्या रँकने तर महाराष्ट्रात टॉपर आहेत. मनपाच्या त्या 38 व्या आणि महिला आयुक्त म्हणून पहिल्या आयएएस अधिकारी असणार आहेत. डॉ. खोडे या दि.17 ला रुजू होणार आहेत.

मनपाचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या रिक्त जागी नागपूर येथील वस्त्रोद्योग मंडळाच्या संचालिका डॉ.माधवी खोडे-चवरे यांची नियुक्ती झाली आहे. त्या यापूर्वी भंडारा,चंद्रपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, 2013 ते 2015 पर्यंत भंडारा येथील जिल्हाधिकारी, 2015 ते 2018 पर्यंत आदिवासी विभाग,नागपूर येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.तर 2018 पासून वस्त्रोद्योग मंडळ,नागपूर येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

2007 च्या आयएएस बॅचमध्ये महाराष्ट्रात टॉपर
सन 2007 मध्ये झालेल्या आयएएसच्या बॅच मध्ये डॉ.माधवी खोडे-चवरे या देशातून 29 व्या रँकने तर महारा÷ष्ट्रातून टॉपर आहेत. दहावीपर्यंत यवतमाळ येथे शिक्षण, अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण नागपूर येथील शिवाजी सायन्स कॉलेज,नागपूर येथे झाले.तर एमबीबीएसचे शिक्षण नागपूर येथील शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये झाले आहे. एमबीबीएसला देखील त्या सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या त्या पहिल्या आयुक्त आहेत.

प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी
प्रशासकीय सेवेत आयएएस अधिकारी डॉ.माधवी खोडे- चवरे यांनी उत्तम कामगिरी केली आहे. आदिवासी विभागात अतिरिक्त आयुक्त असतांना त्यांनी बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.त्याबद्दल त्यांना ’द इंडियन एक्सप्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स ’ आणि डीडी सह्याद्री वाहिणीतर्फे ’हिरकणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

‘विणुया वस्त्र समृद्धी’चे

वस्त्रोद्योग मंडळाच्या आयुक्त, महाराष्ट्र हँडलूम कॉपोर्रेशनच्या व्यवस्थापकीय संचालक असताना हातमागावर निर्मित कापडाचा प्रचार आणि प्रसिद्धी होण्यासाठी विशेष मेहनत घेऊन लोगो आणि ‘विणुया वस्त्र समृद्धी’चे या टॅगलाईनची रचना डॉ. माधवी खोडे-चवरे
यांनी केली.