जळगाव । मेहरूण तलावाचे पर्यटन केंद्र करण्याची योजना सुरु असतांना देशी -विदेशी पक्ष्यांचा अधिवास असलेल्या मेहरूण तलावात चक्क ड्रेनेज पाईप सोडण्यात आल्याने तलाव प्रदूषित होत असल्याची खंत पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी व्यक्त केली आहे. पर्यटनाच्या नावाखाली तलाव खोदण्यात आला व रस्ता रुंदीकारण करण्यासाठी भराव टाकून तलावाचे क्षेत्र कमी करण्यात आले आहे. यातच तलावात ड्रेनेज पाईप सोडण्यात आल्याने रोजच्या रोज तलावातील पाणी दुषित होऊन तेथील जलसृष्टी धोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
गाडगीळ दाम्पत्याचीअपेक्षा!
या दुषित पाण्यामुळे अनेक मासे मेल्याचे आढळले होते. खरेतर शहरातील देशी -विदेशी पक्ष्यांचा एकमेव अधिवास असलेला मेहरूण तलाव संरक्षित क्षेत्र जाहीर करण्याची गरज आहे. पर्यटनस्थळ म्हणून घोषणा करण्यात आलेला मेहरूण तलावात जे सांडपाणी सोडण्यात येत आहे ते त्वरित बंद करण्याची मागणी करत असतांना तलावाचे सुशोभीकारण करतांना रोषणाई व मानवी वर्दळीपासून पक्ष्यांना धोका उत्पन्न होईल परिसरात हिरवीगार दिसणारी विदेशी झाडे न लावता पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी स्थानिक वृक्ष,वेली,झुडपे लावावीत.