मनपाच्या पहिल्या महिला आयुक्तपदी डॉ.विद्या गायकवाड

जळगाव : जळगाव मनपाच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांना महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याची संधी मिळाली आहे. आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश नगरविकास विभागाने बुधवारी सायंकाळी काढले आहेत. गेलीया चार दिवसांपासून प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी डॉ.गायकवाड यांच्याकडेच होती.