मनपाच्या 12 लेटलतिफ कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

0

जळगाव:मनपा आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे आहे. त्यामुळे ते सकाळी 10.15 वाजता मनपात आले होते. त्यांनी अचानकपणे हजेरी तपासली असता 12 कर्मचारी उशीरा आल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी सांगितले. यापूर्वी देखील महापौर भारती सोनवणे आणि उपायुक्त अजित मुठे यांनी तपासणी केली होती.त्यावेळी 100 पेक्षा अधिक लेटलतिफ कर्मचारी आढळून आले होते.