जळगाव । महापालिकेच्या मालमत्ता कराची व पाणी पट्टी कराची 2016-17ची वसूली 80 टक्के कमी वसूली करणार्या अधिकारी व कर्मचार्यांना एक वेतन वाढ कायम स्वरूपी बंद करण्यात आली आहे. उद्दिष्टपुर्तीत कमी असणार्या कर्मचार्यांकडून दंड वसूल करण्याचे तसेच त्यांच्या सेवापुस्तकांन नोंद करण्यात आली आहे. आदेश उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी दिले आहे. यात प्रभाग क्र. 1/07 मधील लिपीक राजेंद्र उमाळे यांनी 45 टक्के, 2/03 मधील मधील लिपीक राजेंद्र तायडे यांनी 46.50 टक्के, 03/07 मधील लिपीक भास्कर पाटील व 3/08 मधील लिपीक मंगेश पाटील यांनी 44.60 टक्के तर 4/09 मधील लिपीक अर्जुन खडके यांनी 40.81 टक्के वसूली केल्याने त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. तर प्रभाग क्र. 3/02चे लिपीक राजेंद्र दिवेकर यांनी केवळ 11 टक्के वसूली केली आहे. तसेच 3/03चे लिपीक संजय सपकाळे यांनी 19.13 टक्के तर हिरालाल महाजन 3/04चे लिपीक यांनी 25.27 टक्के वसूली केल्याने त्यांची दोन वेतनवाढ कायमस्वरूपी बंद केले जाणार आहे.
1 हजार रूपयांचा दंड
80 टक्के वसूली करण्यासाठी प्रयत्न न कर्मचार्यांच्या पगारातून दंड वसूल करण्यात आला आहे. 80 टक्के पेक्षा कमी वसूली करणार्यांमध्ये प्रभाग क्र. 4चे प्रभाग अधिकारी संजय नेमाडे, कर अधिक्षक रमेश चौधरी, प्रभाग क्र. 1/09 मधील लिपीक यशवंत चौधरी, 2/04चे लिपीक गुलाब दुसाने, 2/08चे लिपीक महेश जैस्वाल व 4/07चे लिपीक आरीफ पठाण यांना 500 रूपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच 70 टक्केपेक्षा कमी वसूली करणारे प्रभाग समिती क्र. 2 चे प्रभाग अधिकारी उदय पाटील, 1/01चे लिपीक सुनिल टाक, 2/01चे गणेश आडे, 2/05चे लिपीक राजेंद्र भोळे, 2/06चे लिपीक मुकेश निंबाळकर, 2/07चे लिपीक विलास म्हस्के, 3/09चे लिपीक राजेंद्र जगताप, 4/01चे लिपीक राहुल पवार तर 4/08चे लिपीक काशिनाथ नारखेडे यांना 1 हजार रूपये दंड करण्यात आला आहे.
2 हजार रूपयांचा दंड
प्रभाग समिती क्र. 3चे प्रभाग अधिकारी सुशिल साळुंखे, प्रभाग समिती क्रमांक 4चे कर अधिक्षक चंद्रकांत पंधारे, 1/02चे लिपीक त्र्यंबक कुलकर्णी, 2/02चे लिपीक अमोल पखाले, 2/09चे लिपीक बालाजी होळंबे, 3/05चे लिपीक मधुकर कोळी यांना 2 हजार रूपयांचा दंड करण्यात आला आहे. महापालिका प्रशासन गतीमान होण्यासाठी प्रयत्न सुरू असतांना कर्मचारी कमी पडत असल्याचे चित्र यातून दिसत आहे.