जळगाव। महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी अपहार केलेला असून तो त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी जळगाव जिल्हा जागृतमंचद्वारे जिल्हाधिकारी तथा आयक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात जागृतमंचाद्वारे प्रभारी आयुक्तांनी महानगरपालिकेतील भ्रष्ट व कामचुकार अधिकार्यांवर प्रशासकीय कारवाई व बडतर्फे करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत होत असल्याचे जागृतमंचाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
अपहार प्रकरणी आजी-माजी अधिकार्यांची चौकशी करा
महागगरपालिकेतील भ्रष्टचार व अपहारामुळे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कर्मचार्यांचा पगारास विलंब होत आहे. तसेच काही भ्रष्टाचार प्रकरणातील चौकशीत अधिकारी व कर्मचार्यांनी अपहार केल्याचे सिद्ध झाले असल्याचे प्रभारी आयुक्तांना निदर्शनास आणून दिले आहे. यात महिला व बालकल्याण विभागातील साहित्य खरेदी, आरोग्य विभागात 175 हातगाड्या खरेदी भ्रष्टाचार, आरोग्य विभागातील 1329 कंटनेर आदींच्या खरेदीत जवळपास भ्रष्टाचार झाला असल्याची यादीच जागृतमंचाद्वारे देण्यात आली आहे. यात एकूण 395 कोटी 73 लाख 61 हजार 180 रूपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे जागृतमंचाद्वारे दावा करण्यात आला आहे. यातक्रारीत भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेले काही अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत तर काहींची दुसरीकडे बदली झालेली आहे. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी वसुलीची कारवाई करून भ्रष्टअधिकारी व कर्मचार्यांना बडतर्फे करणे आवश्यक असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.