मनपातील 42 कर्मचार्‍यांची विभागीय चौकशी

0

जळगाव– अनियमितता आणि विविध तक्रारींची दखल घेवून वेगवेगळया प्रकरणांमध्ये मनपाच्या 42 कर्मचार्‍यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.त्यासाठी उपायुक्त अजीत मुठे यांनी संबंधित कर्मचार्‍यांना नोटीस देखील बजावली आहे.
मनपात काही कर्मचारी सह्या करुन निघून जातात.तर काही कर्मचारी कधीही कार्यालयात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.त्यामुळे तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी कारवाई केली होती.तसेच काही कर्मचार्‍यांच्या अनियमिततेमुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. आता पुन्हा संबंधित कर्मचार्‍यांची फाईल ओपन करण्यात आली असून 42 कर्मचार्‍यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्यात आली आहे. विभागीय चौकशीसाठी पुन्हा फाईल ओपन झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.