जळगाव : महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या 55 वर्ष वयोगटातील 298 कर्मचार्यांची शारिरीक व मानसिक स्थिती तपासण्यात आली असून आता त्यांचे गोपनिय अहवाल(सीआर) तपासल्यानंतर पूनर्विलोकनाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.
मनपातील कर्मचारी वेळेत काम करीत नसल्याची कायमच ओरड केली जाते.तसेच काही कर्मचारी आजारी असल्याचे सांगून वैद्यकीय रजा घेत असतात.त्यामुळे 55 वर्ष वयोगटातील कर्मचार्यांची शारिरीक व मानसिक स्थिती तपासण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. त्यानुसार 298 कर्मचार्यांची यादी तयार करण्यात आली आहे. आता संबंधित कर्मचार्यांचे गोपनिय अहवाल तपासण्यात येणार आहे.