जळगाव । महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातर्फे अग्निशमन सेवा सप्ताह अंतर्गत मंगळवारी तज्ञ मान्यवरांचे व्याख्यान, प्रदर्शनी व प्रात्यक्षिके सादर करण्यात येवून जनजागृती करण्यात आली़. महानगरपालिकेच्या प्रशासकिय इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील सभागृहात व्याख्यानाचा तर पार्किंग स्थळाजवळ प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम पार पडला़ यावेळी आयुक्त तसेच सर्व विभागांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते़
अग्निशमन सेवा सप्ताहाचे उद्घाटन
महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने 14 ते 20 एप्रिल असा अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे़ 14 रोजी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, स्थायी समिती सभापती वर्षा खडके, महिला बालकल्याण समिती सभापती कांचन सोनवणे, आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार व सर्व विभाग प्रमुख यांच्या हस्ते व उपस्थितीत सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले़ सप्ताहाअंतर्गत अग्निशमन साहित्य उपकरणे प्रदर्शनी लावण्यात येवून जनजागृती करण्यात आली़ तज्ञांचे व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले़
व्याख्यान व प्रात्यक्षिक
मंगळवार, 18 एप्रिल रोजी मनपाच्या प्रशासकिय इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील सभागृहात रेमंड कंपनी, मेरीको कंपनी, जैन इरिगेशन, होमगार्ड समादेशक येथील तज्ञ मान्यवरांचे सांयकाळी 5 वाजता व्याख्यान झाले़ यावेळी सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते़ तसेच सायंकाळी 6 वाजता पार्किंग स्थळाजवळ एलपीजी गॅस सिलेंडर व पेट्रोल आगीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले़ यावेळी आयुक्त जीवन सोनवणे व अधिकारी उपस्थित होते. अग्निशमन सेवा सप्ताह अंतर्गत अग्निशमन अधिकारी वसंत कोळी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सुनिल मोरे व कर्मचारी वर्गाने कामकाज पाहिले.