मनपात येणार्‍या प्रत्येकांची होणार नोंद

0

जळगाव -मनपाच्या सतरा मजली इमारतीत कामकाजानिमित्त अनेक नागरिक येत असतात.परंतु काही जण विनाकारण फिरत असून गच्चीवरही जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मनपात येणार्‍या प्रत्येक नागरिकांची नोंद केली जाणार आहे.तसेच मनपा कर्मचारी आणि नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार राहणार असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.
मनपात कामानिमित्त नागरिक येत असतात.मात्र काही नागरिक विशेषत: तरुण विनाकारण इमारतीत फिरताना दिसून येतात.तसेच काही जण 18 व्या मजल्यावरील गच्चीवर जावून फोटो सेशन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मनपात येणार्‍यांची नोंद करुन प्रवेशपत्र दिले जाणार आहे.तसेच मनपा कर्मचारी आणि नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार देखील असणार आहे.