मनपात विद्यावेतनावर आयटीआयच्या शिकाऊ उमेदवारांची नियुक्ती

0

जळगाव-महानगरपालिकेत विद्यावेतनावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिकाऊ उमेदवारांना नोकरीची संधी देण्यात आली आहे. मनपाने संगणक,चालक,मॅकेनक ,वायरमन,इलेक्ट्रीशन,सुतार,प्लंबर यापदासाठी अर्ज मागविले होते.4228 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले.अर्जाची छाननी केल्यानंतर 559 अर्ज पात्र ठरले. त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.संगणक पदासाठी 61 उमेदवार मुलाखतीसाठी हजर होते.यातील समितीने 24 उमेदवारांची तर प्रतिक्षा सूचीनुसार 9 उमेदवारांची निवड केली आहे.डिझेल मॅकेनक,वायरमन,इलेक्ट्रीशन,सुतार,प्लंबर,फिटर व सर्व्हेअर पदांकरीता 95 उमेदवार मुलाखतीला हजर होते.निवडसूचीनुसार 26 तर प्र तिक्षासूचीवरील 23 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
विद्यावेतनासाठी 40 लाख खर्चास मंजुरी
मनपात प्रथमच विद्यावेतनावर आयटीआयच्या शिकाऊ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.विद्यावेतनावर येणार्‍या अंदाजित 40 लाख खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवारांना मनपा कामकाजाचा अनुभव मिळणार आहे.तसेच मनपाला तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध झाल्याची माहिती आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी दिली.