जळगाव : महानगरपालिकेत दि. ७ सोमवार रोजी ऑफलाईन लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सकाळी १० वाजता तक्रारदार नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.
शहरातील ज्या नागरिकांनी आपल्या वैय्यक्तीक स्वरुपाच्या तक्रारी किंवा निवेदने १५ दिवसाआधी सादर केले असतील अशा नागरिकांनी दि. ७ रोजी लोकशाही दिनाला हजर रहावे, येतांना चेहऱ्यांवर मास्क लावणे, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे व सॅनेटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. लोकशाही दिनाच्या वेळी कोणत्याही व्यक्तीने कोरोना नियमांचे उल्लघन केले तर, त्या व्यक्तीविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.