धुळे । देवपूरातील जयहिंद सिनिअर कॉलेज समोरील अनधिकृत 5 बॅनर मोठे फलकांवर कारवाई करीत आज महापालिका पथकाने हटवले. महाविद्यालय प्रशासनाने केलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई करण्यात आली. जयहिंद सिनिअर कॉलेज समोर वाढदिवस आणि विविध कार्यक्रमांचे बॅनर लावले जात होते. या बॅनरची गर्दी गेल्या काही दिवसांपासूनच वाढतच चालली होती आणि त्यामुळे महाविद्यालय परिसराचे विद्रुपीकरण होऊन टवाळखोरीतही वाढ झाली होती. या बॅनच अवैध फलकांवर कारवाई करुन महाविद्यालय परिसर मोकळा करावा, अशी तक्रार महाविद्यालयने महापालिका प्रशासनाकडे केली. त्याची दखल घेत आज महापालिकेच्या पथकाने जयहिंद कॉलेजसमोरील मोठे लोखंडी फलक, वाढदिवस शुभेच्छांचे काही बॅनर हटवले. तसेच फलकांच लोखंडी खांब देखील कटरच्या सहाय्याने कापून येथे बॅनर ावले जाणार नाही याची तरतूद केली. या कारवाई वेळी जयहिंद संस्थेचे व्हा.चेअरमन गुलाबराव बोरसे, महाविद्यालयांचे प्राचार्य चुडामण पगारे सर, कैलास मराठे, नाना कोर, अनिल चौधरी, प्रमोद पाटील, महापालिकेचे भामरे, राजेंद्र कदम आणि कामगार उपस्थित होते.