धुळे । एप्रिल महिन्यात एकविरा देवी यात्रोत्सव असून या यात्रोत्सवासाठी येणार्या व्यावसायिकांना जागा देण्याची प्रक्रिया ठेकेदारामार्फत न राबवता स्वतः मनपाने राबवावी, अशी मागणी लोकसंग्रामने केली. या आशयाचे निवेदन आयुक्त संगिता धायगुडे यांना देण्यात आले. महाराष्ट्रातील प्रत्येक शक्तीकडे असलेल्या खान्देश कुलस्वामिनी आई एकविरादेवीच्या यात्रोत्सवात पुढील महिन्यात सुरवात होत आहे.
या यात्रेत पाळण्यांसह विविध स्टॉल लावले जातात व यात्रोत्सव किमान पंधरा ते वीस दिवस चालतो. त्यामुळे अनेक व्यावसायीक व्यवसायासह या ठिकाणी वास्तव्यासाठी राहतात. मागील वर्षी या यात्रेत ठेका देवून यात्रेच्या खाजगीकरण करण्याच्या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी घातला होता. तसाच प्रयत्न यावर्षीही देखील होण्याची शक्यता आहे. मात्र मनपाने यात्रोत्सवाचा असा कुठलाही ठेका न देता ती प्रक्रिया स्वतः राबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात अली. यावेळी निवेदन देतांना अमोल सूर्यवंशी, डॉ.अनिल पाटील, प्रशांत भदाणे, विजय वाघ, संजय बगदे, मनोज व्हाले, मयुर खैरनार, सचिन सूर्यवंशी, प्रवीण राणा, योगेश सोनवणे, दिपक जाधव, प्रकाश महानोर, मोती आवळकंठे आदी उपस्थित होते.