महापौर सीमा भोळे यांच्याहस्ते शुभारंभ
जळगाव-मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षापूर्वी जाहिर केलेल्या 25 कोटींच्या निधीतून मनपासाठी 6 लिफ्ट मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी महापौर सीमा भोळे यांच्याहस्ते नवीन लिफ्ट कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे.
मनपात सहा लिफ्ट आहेत.मात्र चार लिफ्ट नादूरुस्त असून दोन लिफ्ट सुरु आहेत.परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने नवीन लिफ्ट कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार 25 कोटींच्या निधीतून सहा लिफ्टची मंजुरी घेण्यात आली.आज नवीन लिफ्टच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, सभापती स्थायी समिती जितेंद्र मराठे, नगरसवेक राजेंद्र पाटील, कुलभूषण पाटील,मनोज आहूजा, चेतन सनकत,धिरज सोनवणे, विशाल त्रिपाठी, नगरसेविका ज्योती चव्हाण,उज्ज्वला बेंडाळे,.पार्वताबाई भिल, आयुक्त उदय टेकाळे , मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे, विद्युत विभाग प्रमुख सुशिल साळुंखे तसेच मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिवसेना नगरसेवकांचा बहिष्कार
मनपात सोमवारी नवीन सहा लिफ्टच्या कामांचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता.त्यासाठी फलक आणि पत्रिका छापण्यात आली होती.मात्र शिवसेनेचे मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांचे नाव नसल्यामुळे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.तसेच कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार असल्याचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.