मनपासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलनतर्फे निदर्शने

0

जळगाव। मुंबईतील सिध्दीविनायक मंदिर येथे सुरक्षेच्या कारणावरून श्रीफळ नेण्यास शासनाने बंदी घातली आहे. तरी श्रीफळ घेऊन जाण्यास घातलेली बंदी शासनाने त्वरीत मागे घ्यावी, या मागणीसाठी आज शनिवारी सकाळी 10.30 वाजता महानगरपालिकासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलनतर्फे निदर्शने करण्यात आले. यावेळी विविध हिंदूत्व संघटनांनी निदर्शनात सहभाग नोंदवला होता.

सिध्दीविनायक मंदिर येथे सुरक्षेच्या कारणावरून श्रीफळ नेण्यास बंदी घालण्यात आली असून हे निषधार्थ आहे. तसेच हिंदू भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी असते. या निर्णयामुळे भाविकांना फटका बसणार आहे. त्यातच शासन भाविकांना धार्मिक विधी करण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार करत असून त्यामुळे श्रीफळ बंदी ही मागे घेण्यात यावी अशी मागणी यावेळी निवेदनातून राष्ट्रीय हिंदू आंदोलनतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, देशात मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले जात आहे. ते देखील केंद्र शासनाने तत्काळ धर्मांतरबंदी कायदा करून बंदी घालावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.