मनपास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत रंगत!

0

जळगाव । येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरु असलेल्या मनपास्तरीय फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या 17 वर्षाखालील गटात सेंट जोसेफ संघाने रायसोनी इंग्लिश स्कूलचा 1-0 ने पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकाविले. सेंटजोसेफतर्फे वरदा तळेले हिने उत्कृष्ट गोल केला. 19 वर्षाआतील मुलींच्या अंतिम सामन्यात स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे संघाचा 2-0 ने पराभव केला.

चार संघांना मिळाली रजत पदके
पुजा नेमाडे हिने 2 गोल नोंदविल्याने तिला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. 17 वर्षाआती गटात रायसोनीची अंशिता गायकवाड ही उत्कृष्ट खेळाडू ठरली. विजयी- उपविजयी चार संघांना रजत पदके देण्यात आले. त्यात डॉ.प्रीती अग्रवाल, संचालिता डॉ.शिल्पा बेंडाळे, डॉ.अनिता कोल्हे, प्रा.डॉ.अस्मिता पाटील व जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्याहस्ते खेळाडूंना गौरविण्यात आले.