जळगाव: शहर महनगरपालीका, जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय मुलींच्या बुध्दीबळ स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात चौधरी विद्यालयची भाग्यश्री पाटिल ,१७ वर्ष वयोगटात सेंट टेरेसा विद्यालयाची पलक सुराणा व १९ वर्ष वयोगटात विवेकानंद ज्युनिअर कॉलेजची साक्षी बडगुजर यांनी सुवर्णपदक पटकाविले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण जळगांव शहर महनगरपालिकेचे उपमहापौर अश्विन सोनवणे, शिवसेनाच्या नगरसेविका जयश्री महाजन, एम आय एम च्या नगरसेविका सईदा बी शेख,भाजपाचे नगरसेवक धिरज सोनवणे, महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे सचिव फारूक शेख,अरविंद देशपांडे,प्रा.डॉ.अनिता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.