जळगाव । जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शहर मनपा आयोजित मनपास्तरीय 14,17 व 19 वर्षाखालील आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलने 14 वर्षे गटात विजयी व 17 वर्षे गटात उपविजयी होऊन दुहेरी मुकुट मिळविला. 14 वर्षाखालील गटात 14 शाळा, 17 वर्षाखालील गटात 14 व 19 वर्षाखालील गटात 3 शाळांचा समावेश होता.
विजयी-उपविजयी खेळाडूंना मान्यवरांनी गौरविले
स्पर्धा यशस्वीतेसाठी मुख्य पंच सैय्यद बादशाह, सहाय्यक म्हणून अभय मैनपुरी, शेखर सोनवणे, सार्थक सानप, वजीद शेख, सुफीयान शेख, श्रेया जोशी तर गुणलेखक म्हणून वैशाली दीक्षित यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजयी-उपविजयी खेळाडूंना जैन स्पोर्टस् अॅकेडमीतर्फे सुवर्ण व रजत पदके प्रमुख अतिथी एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक सुनिल कुर्हाडे, उपनिरीक्षक आर.व्ही.पवार, बॅडमिंटन असो.चे अरविंद देशपांडे व फारुक शेख यांच्याहस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक आळवणी तर आभार फारुक शेख यांनी मानले.