मनपा अंतर्गत कार्यालयात बायोमॅट्रीक यंत्रणा कार्यान्वित करणार

0

जळगाव-महानगरपालिका कार्यालयाअंतर्गत सतरा मजली इमारत, प्रभाग कार्यालय, युनीट कार्यालय, शाळा आणि रुग्णालयात बायोमॅट्रीक यंत्रणा कार्यान्वित करण्या येणार असल्याची माहिती उपायुक्त अजीत मुठे यांनी दिली. महापालिकेच्या इमारतीसह अन्य महापालिकेच्या कार्यालयामध्ये प्रत्येक कर्मचार्‍यांची बायोमॅट्रीक हजेरी घेतली जाणार आहे. त्यासाठी 60 मशिन दोन-तीन दिवसात महापालिकेत येणार असून ते बसविले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेतील उशीरा येणारे, लवकर घरी जाणारे तसेच कार्यालय सोडून बाहेर फिरणारे कर्मचार्‍यांवर नियंत्रण येणार आहे.

बायोमॅट्रीकला जीपीएस यंत्रणा
महापालिकेत बायोमॅट्रीक यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून प्रत्येक कर्मचार्‍यांचा मोबाईल नंबर देखील याला जोडला जाणार आहे. त्यामुळे जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचारी कार्यालयीन वेळेत कुठे व काय करतो याचे देखील लोकेशन या यंत्रणेतून मिळणार आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करून ती आस्थापना कक्षेला जोडले जाणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांवर नियंत्रण असणार आहे.

मनपात सिसिटीव्हीची नजर
महापालिकेतील केवळ नगरचना विभागात सिसिटिव्ही कॅमेरे असून अन्य कोणत्याच विभाग व प्रशासकीय इमारतीत कॅमेरे नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन पूर्ण इमारतीत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व मजल्यांवर सिसीटिव्ही यंत्रणा देखील कार्यान्वित करण्यात येणार आहे.