मनपा आयुक्तांनी दिले मतदानाचे प्रात्यक्षिक

0

74 जागांसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार

धुळे- धुळे महानगरपालिकेच्या 74 जागांसाठी निवडणूक 9 डिसेंबर रोजी होत आहे. 19 प्रभागातून 356 उमेदवार उभे आहेत त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी निवडणुकीचे प्रात्यक्षिक देऊन मतदान कसे करावे ? त्याबाबत असलेली शंका व प्रश्न विचारात घेऊन त्यांनी आज मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग व धुळे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सुधकार देशमुख यांनी 9 डिसेंबर रोजी होणार्‍या मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. एका मतदाराला चार मतदान करण्याचा अधिकार आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्र कसे हाताळावे मतदान कसे करावे, चार मतदान झाल्यानंतरच मतदाराचे मत नोंदवली जाणार आहे. मतदान झाल्यानंतर प्रक्रिया कशी असणार आहे. याबाबत देखील आयुक्तांनी माहिती दिली.

एक मतदार चार जणांना मतदान करणार
एका प्रभागातील 4 उमेदवारांना एक मतदार मतदान करणार आहे. त्यामुळे एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून येणार आहेत मतदार राजाने निवडणूक व मतदान करताना घ्यावयाची काळजी याची सविस्तर माहिती दिली. आयुक्त आणि निवडणूक अधिकार्‍यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले आयुक्त देशमुख यांनी स्वतः मतदान करून प्रात्यक्षिक दाखवले मतदान यंत्रात कुठलीही गडबड नाही याचीही शाश्वती त्यांनी मतदारांना करून दिली विशेष म्हणजे या प्रात्यक्षिक कार्यक्रमात एकही राजकीय पक्षाचे नेते अथवा कार्यकर्ते उपस्थित नव्हते त्यामुळे एरवी मतदान यंत्रांवर आक्षेप घेणारे कार्यकर्ते व राजकीय पक्षाचे पुढारी या प्रात्यक्षिक कार्यशाळेत आले नाहीत .त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आयुक्तांनी मतदारांना आवाहन केले की, कोणत्याही प्रलोभन आणि भीती मनात भीती मनात न बाळगता मतदान करावे मतदान करावे असे त्यांनी सांगितले.