मनपा उपमहापौरपदी सुनील खडके विराजमान

0

जळगाव: महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडीसाठी भाजपचे सुनील खडके यांचे एकमेव अर्ज दाखल आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज ११ रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कामकाज पहिले. त्यांनी उपमहापौर निवडीची घोषणा केली. यावेळी महापौर भारती सोनवणे, आयुक्त कुलकर्णी उपस्थित होते. त्यानंतर सुनील खडके यांनी पदभार स्वीकारला.

उपमहापौर पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी १० रोजी अंतिम मुदत होती, भाजपकडून सुनील खडके यांचेच दोन अर्ज दाखल झाले होते.