जळगाव: मनपा उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांची अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली. बदलीचे आदेश मंगळवारी प्राप्त झाले आहे. दंडवते त्यांनी उद्या दि. 8 रोजी रुजू होवून तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा असे उपसचिव कैलास बधान यांनी आदेशात म्हटले आहे. दंडवते यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती झाली नाही. त्यामुळे मनपाचे मुख्य लेखाधिकारी कपील पवार यांच्याकडे अतिरक्ति पदभार सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. मनपात उपायुक्त अजित मुठे यांच्यानंतर उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांची बदली झाल्यामुळे दोन्हीपदांवर प्रभारी राज सुरु आहे.