मनपा उर्दू शाळेतील खेळाडूंचा गौरव

0

जळगाव । जळगाव शहर मनपा उर्दू शाळा क्र.35 जी शहरातील पिंप्राळा भागात चालवली जात असून त्या ठिकाणी 1 ली ते 8 वीचे वर्ग असून विद्यार्थीनीची संख्या 126 तर विद्यार्थ्यांची 100 अशी एकूण 226 पटसंख्या असलेल्या या शाळेत क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण 8 विभाग करण्यात येऊन त्यात सांधीक खेळ लंगडी, कबड्डी व डॉज बॉल तर वैयक्तीक खेळात 100 मीटर, लिंबु चमचा, संगीत खुर्ची यांचा समावेश होता. यातील विजयी, उपविजयी व तृतीय खेळाडूस सुवर्ण, रजन व कास्यपदक तर संघास ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेडक्रॉसचे उपाणध्यक्ष गनी मेमन, प्रमुख अतिथी जैन स्पोर्टस् अ‍ॅकडमीचे फारुख शेख, नगरसेवक शरीफ पिंजारी, अतुल बारी, स्कुल कमेटीचे आसिफ खान, मोबीन शेख व हारुन पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते अलीम शेख, अलताफ शेख, अजमद रंगरेज, माजी मुख्याध्यापक गुलाम दस्तगीर व अ.हमीद, प्रशासन अधिकारी वसंत महाजन यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक जकाऊल्लाह शाह यांनी केले.