मनपा कर्मचारी बदल्यांमुळे कामात खोळंबा

0

जळगाव। महानगर पालिकेतील 6व्या मजल्यावरील प्रभाग समिती 1 च्या कार्यालयात नवीन बदलून आलेल्या कर्मचार्‍यांना मालमत्ता कराची पावती कसी बनवावी हेच माहिती नसल्याने नागरिकांना मागील वर्षांची पावती मागणी करण्यात येत आहे. महानगर पालिकेच्या ज्या कर्मचार्‍यांना एका विभागात 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कार्यकाळ झाला आहे अशा कर्मचार्‍यांची तसेच ज्यांना तीन वर्षपेक्षा जास्त कालवधी झालेला नाही मात्र त्यांच्याबद्दल तक्रारी आहेत अशा कर्मचार्‍यांची बदली करण्यात आली आहे. प्रभाग समिती क्र. 1 मधील सर्वच लिपीक व शिपायांची बदली झाली आहे. विभागातील सर्वच कर्मचार्‍यांची बदली झाल्याने नवीन बदलून आलेल्या कर्मचार्‍यांचा पहिला दिवस होता.

नवीन कर्मचार्‍यांमुळे किर्द तयार नाही
नवीन कर्मचार्‍यांना घरपट्टी, पाणी पट्टी कसी आकारली जाते याबाबत ज्ञान नसल्याने विभागात गोंधळ पहायला मिळत आहे. घरपट्टी, पाणी पट्टी भरण्यासाठी नागरिक येत असल्याने त्यांना पवती कसी बनवून द्यावी याची अडचण या नवीन कर्मचार्‍यांसमोर आली आहे. यातच कोणाकडे मागील घरपट्टी, पाणीपट्टी भरणाबाकी आहे याची त्यांना कोणतीही कल्पना नसल्याने मालमत्ता कराच्या भराणा करण्यासाठी येणार्‍यांना सन 2016-17 साली भरलेली पावती आणण्यास सांगण्यात येत आहे.

सर्वच नवीन कर्मचारी असल्याने किर्द तयार करण्यास माणसेंच उपलब्ध होवू शकले नसल्याने बुधवारीची किर्द तयार होवू शकलेली नाही. शासन निर्णयानुसार एका अस्थापनातील 30 टक्के कर्मचार्‍यांचा एकाच वेळी बदली करण्यात येते परंतु, 100 टक्के कर्मचार्‍यांची बदली आयुक्तांनी केल्याने दैनंदिन कामे करण्यात अडचणी येत आहेत.