मुंबई । महानगरपालिकांतील अधिकारी, कर्मचार्यांची अन्य महानगरपालिकेत बदली करण्याबाबत अधिनियमात आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली.
महापालिकेतील कर्मचार्यांची बदली इतरत्र करता येत नसल्याने वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहून गैरकामांना गती मिळत असल्याबाबतची लक्ष्यवेधी सूचना सदस्य गिरीशचंद्र व्यास यांनी मांडली होती. या लक्ष्यवेधीस उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते.