मनपा कर्मचार्‍यांना काठ्या वाटपाने हॉकर्स संतप्त

0

जळगाव । महापालिकेकडून मध्यवर्ती बाजारपेठेतील नो हॉकर्स झोनमध्ये गेल्या काही दिवसांपासून हॉकर्सविरुध्द धडक अतिक्रमण निर्मुलन मोहीम सुरु केली आहे. नुकत्याच अतिक्रमण विभागातील कर्मचारीर्‍यांना महापालिका प्रशासनाने काठ्या वाटप केल्याने हॉकर्स संतप्त झाले. यामुळे चौबे शाळेत कार्यक्रमास आलेल्या आ. सुरेश भोळे यांच्याजवळ अतिक्रमण विभागाच्या अतिरेकीपणाविरुध्द हॉकर्सबांधवांनी संताप व्यक्त केला. अतिक्रमण विभागाने प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी कीशोर राजे निंबाळकर यांच्या आदेशाने सोमवारपासून 15 दिवसांसाठी धडक मोहीम सुरु केली आहे.

आ.भोळेंचे पालकमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन
अतिक्रमण विभागासह आता या मोहीमेत सर्व विभागांचे विभागप्रमुख देखील सहभागी झाले आहेत. बळीरामपेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड, शनिपेठ या भागात हॉकर्स कारवाई होत असल्याने दररोज पथक व विक्रेत्यांची जप्तीमुळे धावपळ व कीरकोळ वाद नित्याचे झाले आहेत. अतिक्रमण विभागातील कर्मचारीर्‍यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने नुकत्याच लाठ्या वाटप केल्या. हॉकर्सला मारण्यासाठी काठ्या दिल्याचा आरोप हॉकर्सनी केला आहे. सुभाष चौक रस्त्यांवरील चौबे शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी आ. सुरेश भोळे आज सकाळी आले असता, संतप्त झालेल्या पुरुष व महीला विक्रेत्यांनी त्यांना घेराव घालून अतिक्रमण विभागाकडून कारवाई करतांना आता काठ्यांचा वापर केला जात असल्याचे सांगीतले. प्रशासनाने फेरीवाला धोरणाची योग्य अंमलबजावणी न करता सुरु केलेली कारवाईची मोहीम चुकीची असल्याचा आरोप हॉर्कसनी केला. हॉकर्सची गर्दी जमल्याने या ठिकाणी गोंधळाची स्थीती निर्माण झाली होती. अतिक्रमण मोहीमेसाठी कर्मचार्‍यांना काठ्या देणे हा अताताईपणाच असल्याची प्रतिक्रीया आ. सुरेश भोळे यांनी दिली. तसेच याबाबत सोमवारी मंत्रालयात होत असलेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.